‘डेक्कन चार्जर्स’ला मिळणार नवीन मालक

September 5, 2012 5:00 PM0 commentsViews: 3

05 सप्टेंबर

आयपीएलमधल्या डेक्कन चार्जर्स टीमला आता नवीन मालक मिळणार आहे. डेक्कन चार्जर्स टीमची पुन्हा एकदा विक्री होणार असल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांकडून समजतंय. डेक्कनची टीम पुढील हंगामात खेळावी ही बीसीसीआयची इच्छा आहे. यासाठी येत्या आठवड्याभरात बीसीसीआय नवं टेंडर काढणार असल्याचं समजतंय. चेन्नई आणि अहमदाबाद मधल्या दोन खासगी कंपन्या डेक्कन चार्जर्स विकत घेण्यासाठी उत्सुक असल्याचीही माहिती मिळत आहे. टीमची बेस प्राईज ही 550 ते 700 कोटी रुपये असण्याची शक्यता आहे.

close