डोन्ट वरी, सध्या पेट्रोल दरवाढ नाही

September 7, 2012 9:28 AM0 commentsViews: 1

07 सप्टेंबर

गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल,डिझेल दरवाढीचे वादळ घोंघावत होते मात्र आता ते नाहीसे झाले आहे. आज पेट्रोलियममंत्री जयपाल रेड्डी यांनी तूर्तास पेट्रोल दरवाढ होणार नाही अशी माहिती दिली आहे. आज पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर पेट्रोलच्या किंमती वाढण्याची शक्यता होती. पण तूर्तास तरी ही दरवाढ लांबणीवर पडली आहे. त्यामुळे सर्वसामान्याना दिलासा मिळाला आहे. जरही दरवाढ झाली असती तर साधारणपणे 5 रुपयांनी वाढ होणार होती. पेट्रोल कंपन्यांनीही यासाठी घोषण करण्याची तयारी केली होती. पण सुदैवाने हे सगळं सध्यातरी टळलं आहे.

close