मारुती नवलेंचा जामीन अर्ज रद्द ; अटकेची शक्यता

September 7, 2012 9:44 AM0 commentsViews: 3

07 सप्टेंबर

पवन गांधी ट्रस्ट फसवणूक प्रकरणी सिंहगड एज्युकेशन इन्स्टिट्युटचे संचालक मारूती नवलेंना सुप्रीम कोर्टाने झटका दिला. सुप्रीम कोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीन आज फेटाळून लावला आहे. कोर्टाने त्यांना दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. मारुती नवलेंना चैनसुख गांधी यांनी एका करारानुसार शाळा चालवण्यासाठी ही जमीन दिली होती. पण नवलेंनी कागदपत्रांमध्ये खाडाखोड करुन जमीन हडपण्याचा प्रयत्न केला. त्यासंदर्भात नवलेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याविरोधात नवलेंनी शिवाजीनगर कोर्ट, मुंबई हायकोर्टात दाद मागितली पण अखेर सुप्रीम कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

close