भारताचे पंतप्रधान अकार्यक्षम- वॉशिग्टन पोस्ट

September 5, 2012 5:40 PM0 commentsViews: 36

05 सप्टेंबर

अमेरिकेतल्या वॉशिंग्टन पोस्ट या प्रतिष्ठीत वर्तमानपत्राने पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर टीका केली. मनमोहन सिंग यांची एकेकाळची प्रामाणिक, विश्वासार्ह प्रतिमा आता नाहीशी झाली आहे. आणि भ्रष्ट सरकारचा गोंधळलेला, अकार्यक्षम प्रमुख अशी त्यांची प्रतिमा झाली आहे असं वॉशिग्टन पोस्टच्या एका लेखात म्हटलं आहे. या लेखाबद्दल काँग्रेसने वॉशिंग्टन पोस्टला फटकारलंय. वॉशिंग्टन पोस्टने दिलगिरी व्यक्त केलीय आणि आता पंतप्रधानांची प्रतिक्रियाही प्रसिद्ध केली जाणार आहे, असा दावा पंतप्रधान कार्यालयाने केला आहे. पण दिलगिरी मागितल्याच्या बातमीचं वॉशिंग्टन पोस्टनं खंडन केलं आहे. या अगोदरही 'टाइम' मॅकझिनने पंतप्रधानांना अंडरअचिव्हर म्हटले होते.

close