गॅस टँकरची गळती, मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे ठप्प

September 6, 2012 9:53 AM0 commentsViews: 5

06 सप्टेंबर

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर दुपारी 1 च्या सुमारास गॅस टँकर आणि टेम्पोची धडक झाल्याने 5 तास वाहतूक ठप्प झाली होती. गॅस टँकरमधून गॅसची गळती होत असल्याने एक्सप्रेस हायवे आणि जुना मुंबई-पुणे हायवे बंद करण्यात आल्यामुळे 8 ते 10 किलोमिटर वाहनाची रांग लागली होती. टँकरमध्ये एलपीजी गॅस होता. या गॅसची गळती सुरू झाल्याने खंडाळ्याजवळ दोन्ही हायवे एकत्र येत असल्याने दोन्ही मार्गांवरची वाहतूक बंद ठेवण्यात आली. याची खबरदारी घेत खंडाळा परिसरात अपघाताच्या स्थळापासून जास्तीत जास्त दूर जावे असं आवाहन आयआरबीचे केलं होतं. जुन्या एक्सप्रेस वेवर आता वाहतूक धीम्या गतीनं सुरू झालीय. खंडाळा गावातल्या लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्यात. लोकांनी घरात विद्युत उपकरणे आणि गॅसचा वापर करू नये, असं आवाहनही करण्यात आलंय. गावातल्या शाळेलाही सुट्टी देण्यात आलीय.

close