संसदेचं कामकाज 12 व्या दिवशीही ठप्पच

September 6, 2012 10:11 AM0 commentsViews: 2

06 सप्टेंबर

अगोदर कोळसा घोटाळा आणि नंतर एससी एसटीना सरकारी नोकरीत बढतीत आरक्षण यावरुन आजही संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा 12 वा दिवस कामकाजाशिवाय वाया गेला. आजही कामकाज सुरु होताच विरोधकांनी गदारोळ सुरु झाला. त्याअगोदर सरकारने विरोधकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भाजप नेत्या सुषमा स्वराज आणि लालकृष्ण अडवणी यांच्याशी चर्चा ही केली. पण त्याचा उपयोग झाला नाही. उद्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सरकारी नोकर्‍यांमध्ये बढतीचं वादग्रस्त विधेयक या अधिवेशनात मंजूर होण्याची शक्यता नाही.

close