सचित पाटीलला जामीन मंजूर

September 7, 2012 2:55 PM0 commentsViews: 99

07 सप्टेंबरअभिनेता सचित पाटील वरील आरोप सिद्ध न झाल्यामुळे सचित पाटीलला जामीन मंजूर झाला आहे. पर्वरी पोलिसांनी लोटस (LOTS) या मसाज पार्लरवर छापा टाकला तेव्हा सचित पाटील पार्लरमध्ये होता. गोवा पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर सचित पाटील निर्दोष असल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी त्याला जामीन दिला आहे.

गोव्यात लोटस मसाज पार्लरवर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात झेंडाफेम अभिनेता सचित पाटील सापडल्यामुळे मराठी चित्रपट सृष्टीत एकच खळबळ उडाली. पोलिसांना त्याला ताब्यात घेतले. या कारवाईत दार्जिलिंग येथील पाच मुलींनाही ताब्यात घेण्यात आलंय. तसेच मसाज पार्लरचा मालक हरिकांत मिश्रा यालाही पोलिसांनी अटक केली. पर्वरीतील या मसाज पार्लमध्ये देहविक्री सुरु होती. 'नो एंट्री पुढे धोका आहे' या सिनेमाच्या प्रिमिअरसाठी सचित गोव्याला आला होता.

close