संसदेला वेठीला धरणं म्हणजे लोकशाहीचा भंग – पंतप्रधान

September 7, 2012 11:13 AM0 commentsViews: 2

07 सप्टेंबर

संसदेचं पावसाळी अधिवेशन आज गदारोळातच संपलं. त्यानंतर पंतप्रधानांन मनमोहन सिंग यांनी संसदेचं कामकाज बंद पाडल्याबद्दल भाजपवर तोफ डागली. संसदेला वेठीला धरणं म्हणजे लोकशाही आणि संसदीय आदर्शांचा भंग असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. कॅगबद्दल आपल्याला आदर आहे. पण कुठल्याही अहवालावर संसदेत चर्चा होणे गरजेच आहे. सध्या आपण कोणत्या दिशेन चाललो आहे ? हा लोकशाहीसाठी योग्य मार्ग आहे का ? असा सवालही पंतप्रधानांनी उपस्थित केला. कोळसा खाण वाटप घोटाळ्यावरुन विरोधकांनी संसदेचं कामकाज 13 दिवशीही बंद पाडले. पावसाळी अधिवेशनाचा शेवटही आज गदारोळातच झाला. लोकसभा-राज्यसभा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.

close