संसदेतली लढाई आता लोकांपर्यंत नेणार -सुषमा स्वराज

September 7, 2012 11:17 AM0 commentsViews: 3

07 सप्टेंबर

कोळसा घोटाळ्याला पंतप्रधान थेट जबाबदार आहेत. त्यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी भाजपचे नेते सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांनी केली. संसदेतली लढाई आता संसदेच्या बाहेर सुरू ठेवण्याची घोषणा भाजपने केली. सरकारने आमच्या दोन मागण्या मान्य केल्या नसल्यानंच संसदेचं कामकाज होऊ शकलं नाही. पण संसदेचं कामकाज चालू न देऊन आपण लोकांना संदेश दिलाय असा दावा भाजपने केलाय. कोळसा खाणवाटपाचा फायदा सरकारशी संबंधित लोकांनाच झालाय. त्यामुळे कोळसा खाणवाटप रद्द व्हायला हवं अशी मागणी भाजपने केली आहे.

close