अंधश्रद्धेतून पत्नी, 3 मुलांची हत्या करुन पतीची आत्महत्या

September 6, 2012 12:23 PM0 commentsViews: 6

06 सप्टेंबर

पुण्यात पतीनेच आपल्या पत्नी आणि 3 मुलांची हत्या करुन स्वत:ही आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.कोथरुडमधील लोकमान्य नगरमध्ये गवंडी काम करणार्‍या परशुराम काळकाटी यानं अंधश्रद्धेतून आपलं कुटुंब संपवल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पण यामुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे.

एक संशय करणीचा..आणि अख्ख कुटुंब एका क्षणात संपलं…अंगावर शहारे आणणरी ही घटना पुण्याच्या कोथरुड भागातील लोकमान्य नगरमध्ये घडली. इथल्या झोपडपट्टीत राहून गवंडी काम करणार्‍या परशुराम काळाकाटी यानं आपली पत्नी, मुलगा आणि 2 मुलींची हत्या केली. नंतर स्वत:ही पेटवून घेऊन आत्महत्या केली. पण परशुरामनं अंधश्रद्धेतून हा प्रकार केल्याचा संशय पोलिसांना आहे. परशुराम हा मानसिक रुग्ण होता आणि आपल्यावर कोणीतरी करणी केलीये असा संशय त्याला होता, यातूनच त्यानं आपलं कुटुंब संपवलं असा आरोप परशुरामची पत्नी गायत्री हिची बहिण गंगा हिने केला आहे.

21 शतकातही अजून अंधश्रद्धेतून असे बळी जातायत, कोवळ्या कळ्या खुडल्या जात आहे. आर्थिक दृष्ट्या कमकुवत अशा वर्गात या अंधश्रद्धेला लवकर जागा मिळते हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. त्यामुळेच या प्रश्नाकडे सामाजिक आणि आर्थिक दृष्टीकोनातून पाहण्याची गरज आहे.

close