मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेची वाहतुकीची कोंडी सुटली

September 6, 2012 1:05 PM0 commentsViews: 2

06 सप्टेंबर

मुंबई पुणे एक्स्प्रेसवर खंडाळ्याजवळ गॅस टँकर आणि टेम्पोच्या धडकेमुळे टँकरमधून एलपीजी गॅसची गळती झाल्यानं तब्बल पाच तास दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. पण आता हळुहळू वाहतुकीची कोंडी सुटत आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरू झाली असून मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूकही सुरू होण्याची शक्यता आहे. पण 5 तास वाहतूक ठप्प राहिल्यामुळे 8 ते 10 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. दरम्यान, खंडाळा गावातल्या लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पण टँकरमधून होणार्‍या गॅस गळतीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याने आजूबाजूच्या लोकांनीही सुटकेचा निश्वास सोडला आहे.

close