ओडिशा दंगल प्रकरणी टायटलर यांच्यावर गुन्हा दाखल

September 8, 2012 7:40 AM0 commentsViews: 15

08 सप्टेंबर

ओडिशा विधानसभेबाहेर गुरूवारी काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलीस यांच्या जोरदार धुमश्चक्री झाली होता. याप्रकरणी काँग्रेस नेते आणि ओडिशाचे प्रभारी जगदीश टायटलर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमावाला चिथावणे, हिंसाचार आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेत. पण टायटलर यांनी या सर्व आरोपांचं खंडन केलंय. कोळसा खाणीचे ब्लॉक वाटप करताना मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी सुचवलेल्या नावानंच खाणीचं ब्लॉक वाटप केल्याचा आरोप करत काँग्रेसतर्फे विधानसभेबाहेर आंदोलन करण्यात आलं होतं. त्यावेळी कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यातला वादानं हिंसक वळण घेतलं होतं. यात एका महिला पोलीस शिपायालाही जबर मारहाण करण्यात आली होती.

close