युवी कमबॅकसाठी सज्ज

September 7, 2012 1:49 PM0 commentsViews: 3

07 सप्टेंबर

न्यूझीलंडला टेस्ट सीरिजमध्ये व्हाईटवॉश दिल्यानंतर आता भारतीय टीम सज्ज झाली आहे टी-20 सीरिजसाठी… पण या मॅचमध्ये सर्वांचं लक्ष लागलंय ते धडाकेबाज बॅट्समन युवराज सिंगच्या कमबॅककडे.. कारण कॅन्सरविरुध्दची लढाई यशस्वीपणे जिंकणारा युवी आता मैदानावरच्या नव्या लढाईसाठी सज्ज झाला आहे.

भारतीय क्रिकेट जगतात सर्वाधित उत्सुकता असलेल्या या पुनरागमनाची सर्वजण वाट पहात आहे. नोव्हेंबर 2011 नंतर पहिल्यांदाच युवराज सिंग टीम इंडियाच्या जर्सीत दिसणार आहे. न्यूझीलंडविरुध्दच्या पहिल्या टी-20 मॅचमध्ये युवराज सिंग मैदानात उतरेल. कॅन्सरवर यशस्वीपणे मात करत युवी आता नव्या इनिंगसाठी सज्ज झाला आहे.

युवराज सिंगसाठी ही केवळ एक क्रिकेट मॅच नाहीए.. कमबॅक नंतर त्याला स्वता:ला सिद्ध करावं लागणार आहे. तसं युवराज सिंगला हे आव्हान कठीण नाही. तो एक लढवय्या क्रिकेटर म्हणूनच ओळखला जातो, आपल्या याच आक्रमकतेच्या जोरावर त्याने भारताला दोन वर्ल्ड कपही जिंकून दिलेत. 2007 ला त्याने टी-20 वर्ल्ड कपमध्ये स्टुअर्ट ब्रॉडला मारलेले 6 सिक्स अजूनही वर्ल्ड कपमधली सर्वात संस्मरणीय खेळी आहे. तर 2011 ला वर्ल्ड कपमध्ये मॅन ऑफ द सीरिजचा खिताब पटकावत त्यानं भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पण या वर्ल्ड कप विजायाचा आनंद त्याला फार काळ उपभोगता आला नाही. काही महिन्यातच युवराज कॅन्सर झाल्याचं निदान समोर आलं. पण या आजारालाही युवी निधड्या छातीनं सामोरं गेला.

युवराज सिंगनं एकच ध्येय बागळलं होतं, ते म्हणजे पुन्हा मैदानात उतरण्याचे आणि अवघ्या काही महिन्यातच त्यानं हे ध्येय पूर्णही केलं. श्रीलंकेत होणार्‍या टी 20 वर्ल्ड कपसाठी युवराजची भारतीय टीममध्ये निवड केली गेली आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी 20 मॅचमध्ये अंतिम अकरा खेळाडूंमध्ये युवराजचा समावेश असेल की नाही हे अजून ठरायचंय. पण युवराजचा कमबॅक भारतीय क्रिकेटसाठी एक वेगळी दिशा देणारा ठरलाय हे नक्की..

close