सरकारकडून मिळणार जिल्हा सहकारी बँकांना ‘जीवनदान’

September 6, 2012 4:31 PM0 commentsViews: 15

06 सप्टेंबर

राज्यातील सहा जिल्हा सहकारी बँकांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आता राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. राज्य सरकार या बँकांना 551 कोटी रुपयांची मदत करणार आहे. तसा प्रस्ताव सहकार विभाग मंत्रिमंडळासमोर ठेवणार आहे. नागपूर , वर्धा , बुलढणा , जालना, धुळे-नंदुरबार आणि उस्मानाबाद या सहा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका अडचणीत आहेत. या बँकांना रिझर्व बँकेचा बँकींग परवाना मिळवता आलेला नाही. पण आता नाबार्डने या बँंकांना 4 टक्के सीआरएआरची अट पू्र्‌ण करण्यासाठी 551 कोटी रुपये कमी पडतात असा अहवाल दिलाय. त्यामुळे या बँकांना राज्य सरकारने समभागाच्या रुपात 551 कोटी रुपयांची मदत करावी असा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सहकार विभागाच्यावतीने लवकरच ठेवला जाणार आहे. अशी माहिती सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

close