टीम इंडियाच्या कोच होण्याची गांगुलीची इच्छा

September 7, 2012 2:03 PM0 commentsViews: 3

07 सप्टेंबर

बीसीसीआय अनुकूल असेल तर आपल्याला भारतीय क्रिकेट टीमचा कोच होण्यास आवडेल असं मत व्यक्त केलंय भारताचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीनं.पण भविष्यात काय होईल हे आता सांगता येणार नाही असंही गांगुलीने स्पष्ट केलं. खेळाडूंची क्षमता, त्यांचा फॉर्म आणि विकास या सर्व पार्श्वभूमीवर मी स्वतंत्र पद्धतीने विचार करु शकेन, असं मला वाटतं भारतीय क्रिकेटला परतफेड करण्याचं हेच योग्य माध्यम असल्याचं गांगुलीनं म्हटलं आहे. भारतातील सर्वाधिक यशस्वी कॅप्टनपैकी गांगुली हा एक कॅप्टन आहे. सध्याचे कोच डंकन फ्लेचर भारतीय टीमसाठी यशस्वी ठरत असतील तर त्यांना कायम ठेवणं आवश्यक आहे त्यांच्या जोडीला भारताची युवा टीम आहेच असं मतही गांगुलीनं मांडलं आहे.

close