मनसे आमदार हर्षवर्धन जाधव यांना कोर्टाचा दिलासा

September 10, 2012 9:43 AM0 commentsViews: 74

10 सप्टेंबर

मनसे आमदार हर्षवर्धन जाधव मारहाण प्रकरणी खुलताबाद कोर्टाने पोलिसांचा दावा फेटाळला आहे.आमदारानेच आम्हाला मारहाण केली असा दावा पोलीसांनी कोर्टात केला होता. पण पोलिसांचा हा दावा कोर्टाने फेटाळल्याने हा पोलिसांना कोर्टाने दिलेला हा धक्का मानला जात आहे. जानेवारी 2011 मध्ये पोलिसांनी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अमानुष मारहाण केल्याची घटना घडली होती. औरंगाबाद मधलं राजकारणही या मारहाणीच्या घटनेनं ढवळून निघालं होतं. जानेवारी 2011 मध्ये मुख्यमंत्री औरंगाबाद दौर्‍यावर होते. या दौर्‍याच्या निमित्ताने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण वेरुळ लेणी पाहण्यासाठी खुलदाबादकडे निघाले असताना हर्षवर्धन जाधव यांनी आपली गाडी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना मज्जाव केला. यावेळी पोलिसांत आणि जाधव यांच्यात बाचाबाची झाली. पर्यायाने पोलिसांनी जाधव यांना ताब्यात घेऊन अमानुष मारहाण केली होती.

close