पानमसाला उत्पादकांची याचिका कोर्टाने फेटाळली, बंदी कायमच

September 7, 2012 3:06 PM0 commentsViews: 82

07 सप्टेंबर

राज्य सरकारने गुटखा आणि पानमसाल्यावर बंदी केल्यानंतर गुटखा कंपन्यांनी कोर्टात धाव घेतली. पण हायकोर्टाने गुटखा बंदी कायम ठेवत कंपन्यांची याचिका फेटाळून लावली. यातून पळवाट म्हणून पानमसाला गुटखा नाही त्यावर बंदी आणू नये अशी मागणी कंपन्यांनी केली होती. पण पानमसाला उत्पादकांना दिलासा द्यायला हायकोर्टाने नकार दिला आहे. पानमसाल्यावर बंदीचा राज्य सरकारचा निर्णय कायम ठेवत पानमसाला उत्पादकांची याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. गुटखा आणि पानमसाल्यात फरक नाही काहीच फरक नाही, असं हायकोर्ट म्हटलं आहे.आणि पानमसाल्यावरची बंदी उठवायला नकार दिला आहे.

close