‘जलसिंचन खात्यात 35 हजार कोटींचा भ्रष्टाचार’

September 10, 2012 9:51 AM0 commentsViews: 62

10 सप्टेंबर

जलसिंचन विभागामध्ये गेल्या पंधरा वर्षांत 35 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जलसिंचन खात्याच्या तांत्रिक समितीचे सदस्य विजय पांढरे यांनी केला आहे. जलसिंचन खात्याअंतर्गत विविध पाटबंधारे महमंडळाच्या कामांमधले 20 हजार कोटी रुपये तर उपसा सिंचन योजनांमध्ये15 हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप पांढरे यांनी केला आहे.

merry म्हणजेच महाराष्ट्र इंजिनिअरिंग अँड रिसर्च इन्सस्टीट्ुयुट नाशिकचे चीफ इंजिनिअर आणि या आरोपांचं पत्र गेल्या 5 मे रोजी जलसिंचन खात्याचे सचिव, मुख्यमंत्री आणि राज्यपालांना लिहलं आहे. सिंचन प्रकल्पांचा गेल्या 15 वर्षांचा आढावा या पत्रात विजय पांढरे यांनी घेतला आहे. यात आघाडी सरकारबरोबरच युती सरकारच्या काळातल्या योजनांबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आतापर्यंत जलसिंचनाच्या कामांवर 70 हजार कोटी खर्च करण्यात आले. त्यापैकी 35 हजार कोटींचा गैरव्यवहार झाले आहे. असा आरोप पांढरे यांनी केला. त्यांनी आपल्या पत्रात जलसिंचन प्रकल्प आणि उपसा सिंचन योजनांच्या कामामध्ये कशा पद्धतीनं गैरव्यवहार झाला याची अनेक उदाहरण दिली आहे. आधीच जलसिंचन खात्याने श्वेतपत्रिका जारी करावी अशी मागणी विरोधकांकडून झाली आहे. तसा आग्रह मुख्यमंत्र्यांनी धरलाय.

पण राष्ट्रवादीचे नेते मात्र श्वेतपत्रिकेच्या मागणीवर अजूनही विचारचं करत आहे. विजय पांढरे यांच्या पत्रामुळे जलसिंचनातल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. सिंचन प्रकल्पांचा गेल्या 15 वर्षांचा आढावा या पत्रात विजय पांढरे यांनी घेतला. यात आघाडी सरकारबरोबरच युती सरकारच्या काळातल्या योजनांबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

close