यंदा साखरेचं उत्पादन 40 टक्क्यांनी घटणार

September 7, 2012 3:13 PM0 commentsViews: 1

07 सप्टेंबर

यंदाचा उसाचा गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पण यंदा साखरेचं उत्पादन 40 टक्क्यांनी घटणार आहे. यंदा दुष्काळाचा आणि पाणीटंचाईचा फटका बसला. उसाचा वापर मोठ्या प्रमाणात चार्‍यासाठी झाला. तसेच पाणीटंचाईमुळे उसाच्या शेतीवर विपरीत परिणाम झालाय. त्यामुळे उसाचं अडीच लाख हेक्टर क्षेत्र वाया गेलंय. 2012 -13 च्या हंगामात केवळ 62 लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन होणार आहे. म्हणजेच साखरेचं उत्पादन 40 टक्क्यांनी घटणार आहे. यासाठी राज्य सरकार लवकरच केंद्राकडे विशेष शुगर पॅकेजची मागणी करणार असल्याचे सुतोवाच सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केलं आहे.

close