त्रिवेदींना 24 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

September 10, 2012 10:57 AM0 commentsViews: 12

10 सप्टेंबर

वादग्रस्त व्यंगचित्रकार असीम त्रिवेंदींना 24 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. असीम त्रिवेदींनी जामिनासाठी अर्ज करायला नकार दिला. जोपर्यंत देशद्रोहाचा गुन्हा काढून घेतला जात नाही तोपर्यंत जामिनासाठी अर्ज करणार नाही. जेलमध्ये मला कितीही दिवस ठेवले तरी चालले पण वकिल घेणार नाही अशी भूमिका असीमने घेतली आहे.

पोलिसांनीही त्रिवेदींची चौकशी पूर्ण झाली आहे. त्यामुळे त्यांना 16 सप्टेंबरपर्यंत कोठडीची गरज नाही. त्यामुळे त्यांना कोर्टात हजर करण्याचे आदेश गृहमंत्री आर आर पाटील यांनी दिले. त्यानुसार त्यांनी बांद्रा कोर्टात हजर करण्यात आले. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केल्यानंतर आता पोलिसच अडचणीत आले. त्रिवेदी जामिनासाठी अर्ज करु शकतात, असं पोलिसांनी सांगितलं आहे. पण देशद्रोहाचा गुन्हा मागे घेतल्याशिवाय जामिनासाठी अर्ज करणार नाही, अशी भूमिका असीम त्रिवेदी यांनी घेतली. इंडिया अगेन्सट करप्शनचे कार्यकर्ते मयांक गांधी यांनी आम्ही असीमच्या सोबत आहोत असीमने जामीन घेण्यास नकार दिला आहे त्यामुळे जेलमधून पुढची लढाई लढणार आहोत असं स्पष्ट केल.

असीम त्रिवेदींनी काय केलं ?

असीम त्रिवेदींनी काय केलं ? हा प्रश्न अनेक भारतीयांना पडला आहे. 24 वर्षाचा असीम त्रिवेदी हा इंडिया अगेन्सट करप्शनचा कार्यकर्ता. डिसेंबर 2011 मध्ये अण्णा हजारे यांचे मुंबईत एमएमआरडीए मैदानावर तीन दिवसांचे उपोषण झाले होते. यावेळी असीमने भ्रष्टाचाराविरोधात आक्षेपार्ह व्यंगचित्र काढून मैदानावरच प्रदर्शन भरवले होते. यामध्ये संसदेला 'टॉयलेट'म्हणून दाखवले होते. तर भारताचे मानचिन्ह सत्यमेव जयते या चिन्हावर सिंहांच्या जागी लांडग्याचे चित्र रेखाटून 'भ्रष्टमेव जयते' असे दाखवले होते.

याहीपेक्षा भारतमाता, काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग, सोनिया गांधी,मनमोहन सिंग यांचेही आक्षेपार्ह व्यंगचित्र काढले होते. हे सर्व व्यंगचित्र असीमने 'इंडिया अगेन्सट कार्टून करप्शन' या वेबसाईटवर अपलोड केले होते. सामाजिक कार्यकर्त्यांनी या व्यंगचित्रावर आक्षेप घेतला आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने असीमची वेबसाईट बंद पाडली. तरीसुध्दा असीमने ब्लॉग,फेसबुकच्या माध्यमातून व्यंगचित्र पोस्ट केले होते. 7 जानेवारी 2012 मध्ये बीडमध्ये असीम त्रिवेदींवर कार्टूनप्रकरणी राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

close