मनोज जयस्वाल यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी ‘कनेक्शन’

September 7, 2012 4:10 PM0 commentsViews: 13

07 सप्टेंबर

कोळसा खाणवाटप घोटाळ्यात नाव असलेल्या मनोज जयस्वाल यांचे अनेक पक्षातल्या नेत्यांशी संबंध असल्याचे उघड झाले आहे. जयस्वाल यांचे काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबरच भाजपमधल्या ज्येष्ठ नेत्यांशीही जवळीक असल्याचं फोटोत कैद झालाय. केंद्रीय मंत्री श्रीप्रकाश जयस्वाल, प्रफुल्ल पटेल आणि कमलनाथ, भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, मुरली मनोहर जोशी यांच्याशी संबंध असल्याचे बाब समोर आली आहे.

उद्योगपती मनोज जयस्वाल हे नागपूरमधले एक बडे प्रस्थ आहेत. अभिजित ग्रुप, जेएसएल इन्फ्रास्ट्रक्चर आणि एएमआर आयर्न ऍण्ड स्टील्स या कंपन्यांची रस्ते विकास, ऊर्जा, स्टील, लोखंड आणि खनिज उत्खनन क्षेत्रात मोठी गुंतवणूक आहे. मनोज जयस्वाल यांचे अनेक मोठ्या राजकारण्यांशी संबंध आहेत. त्यातही केंद्रीय कोळसामंत्री श्रीप्रकाश जैयस्वाल, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. श्रीप्रकाश जयस्वाल तर मनोज जयस्वाल यांचे जवळचे नातेवाईक आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मनोज जयस्वाल यांनी नागपुरात मुलीच्या लग्नाचं जंगी रिसेप्शन आयोजित केलं होतं. त्यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली होती. केंद्रीयमंत्री श्रीप्रकाश जयस्वाल, प्रफुल्ल पटेल आणि कमलनाथ, तसेच भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह सर्वच पक्षांमधील नेत्यांशी मनोज जयस्वाल यांचे संबंध आहेत.

close