तळोजा कारागृहाच्या उपनिरीक्षकांवर गोळीबार

September 10, 2012 11:08 AM0 commentsViews: 18

10 सप्टेंबर

नवी मुंबईतल्या तळोजा जेलचे सब इन्स्पेक्टर भास्कर कचरे यांच्यावर अज्ञात इसमाने गोळीबार केला आहे. कचरे यांना दोन गोळ्या लागल्या आहेत. त्यांना कळंबोलीतल्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तवेरा गाडीतून कचरे जात असताना बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या प्रकरणात कळंबोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपूर्ण नवी मुंबई परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. तळोजा जेलमध्ये अबू सालेम, अरूण गवळी, डी. के. राव यांच्यासारखे गँगस्टर शिक्षा भोगत आहे. त्यामुळे कचरे यांच्यावर गोळीबार कोणी केला असावा याचा पोलीस तपास करत आहे.

close