‘कोलगेट’मध्ये भुजबळांसह आणखी 3 मंत्र्यांचे हात काळे- सोमय्या

September 7, 2012 4:21 PM0 commentsViews: 3

07 सप्टेंबर

कोळसा खाण घोटाल्यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आणखी काही नवे आरोप केले आहेत. कोळसा घोटाळ्यात सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांचेही हात काळे असल्याचं त्यांनी म्हटलंय. कोळसा खाण घोटाळ्यात आरोपी असलेले अभिजीत जयस्वाल या उद्योगपतीशी भुजबळांचे घनिष्ठ आर्थिक संबंध असल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय. भुजबळांनी 1 हजार 256 कोटींचं रस्त्याचं कंत्राट जयस्वाल ग्रुपला दिलं होतं आणि त्या बदल्यात भुजबळांच्या आर्मस्ट्राँग एनर्जी कंपनीचे शेअर्स अभिजीत ग्रुपने विकत घेतले, असं सोमय्यांचं म्हणणंय. शिवाय कोळसा घोटाळ्यात राज्यातले तीन मंत्री असल्याचा दावाही सोमय्यांनी केला. त्यांनी आज सीबीआयच्या ऑफिसमध्ये जाऊन कोळसामंत्री श्रीप्रकाश जयस्वाल, केंद्रीय मंत्री सुबोधकांत सहाय आणि दर्डा बंधूंविरोधात तक्रार दाखल केली आहे.

close