मराठवाडा तहानलेलाच, दुष्काळ स्थिती कायम

September 10, 2012 11:27 AM0 commentsViews: 31

10 सप्टेंबर

मराठवाड्यात तब्बल अडीच महिन्यानंतर समाधानकारक पावसाने हजेरी लावली. पण, या पावसाने मराठवाडयातला दुष्काळ काही हटला नाही. पिण्याच्या पाण्याची समस्या होती ती तशीच आहे. मराठवाड्यातल्या उस्मानाबाद, जालना, बीड आणि औरंगाबाद या शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. मराठवाडयतीलं सर्वात मोठं धरण असलेल्या जायकवाडी धरणावर औरंगाबाद शहराचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. आता त्याच धरणामध्ये मृत पाणीसाठा शिल्लक असल्याने औरंगाबादला पाणीपुरवठा करणं अवघड झालं आहे. त्यामुळे औरंगाबादकरांवर पाणीकपातीची तलवार लटकत आहे.

close