वरिष्ठांच्या छळाला कंटाळून महिला काँस्टेबलची आत्महत्या

September 10, 2012 11:34 AM0 commentsViews: 1

10 सप्टेंबर

औरंगाबादमध्ये करमाड पोलीस स्टेशनच्या एका महिला काँस्टेबलने शारिरीक आणि मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. संध्या मोरे असं या महिला कॉन्स्टेबलचं नाव आहे. संध्याचे दीड वर्षांपूर्वीच लग्न झालं होतं. तिचे पती हे सैन्यात आहेत. संध्या यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पोलीस स्टेशनचे एपीआय वाय.एन. शेख यांचं नाव घेतलंय. शेख हा गेल्या काही दिवसांपासून त्रास देत होता. त्यांची तक्रारही संध्या यांनी केली होती. मात्र केवळ शेखला समज देण्यात आली होती. घटनेच्या दिवशी संध्या पोलीस स्टेशनमध्ये कामावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांचा वाद झाला. त्यानंतर त्या घरी गेल्या आणि पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी एपीआय शेखला निलंबित करण्यात आलंय. आज पुन्हा एकदा शेखची चौकशी करण्यात आली आहे. त्यांच्यावर आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचा खटला दाखल करण्यात आला आहे. लवकरच शेख आणि त्याच्या सहकार्‍याला अटक होण्याची शक्यता आहे.

close