पक्षाचा निर्णय जनतेवर सोपवणार -अण्णा हजारे

September 8, 2012 3:46 PM0 commentsViews: 7

08 सप्टेंबर

आम्ही लोकशाहीचा आदर करतो यासाठीच आम्ही लोकांसमोर जाणार आहोत लोकांना विचारण की पक्ष काढायचा की नाही हे जनतेवर सोपवणार आहे असं स्पष्ट खुलासा अण्णा हजारे यांनी केला.तसेच देशातील चांगले विचारवंत यांच्याशी बैठक करुन त्यांचा सल्ला घेतला जाईल. यासाठी दक्षिण भारत आणि दिल्लीत बैठक घेतली जाईल पण आपण राजकीय पक्षात जाणार नाही असंही अण्णांनी स्पष्ट केलं. तसेच जो कोणीही उमेदवार निवडला जाईल तो चारित्र्यावान असावा त्याला सामाजिक कार्याचा अनुभव असावा आणि जनतेमध्ये त्यांची प्रतिमा कशी आहे हे महत्वाचे आहे. त्या उमेदवारीची निवड आम्ही वेबसाईटवर प्रसिध्द करु आणि निवडून आल्यानंतर त्याने शपथपत्र लिहून द्यावे ज्यात तो लाल दिव्याची गाडी, सरकारी बंगला, सुरक्षारक्षक घेणार नाही आणि वर्षभराची आपली संपत्ती जनतेसमोर जाहीर करले अशा अटी केजरीवाल यांनी जाहीर केल्या. अण्णा जे म्हणतील तसेच होईल असंही केजरीवाल म्हणाले.भ्रष्टाराविरोधी राजकीय आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी आज राळेगणमध्ये जाऊन अण्णा हजारेंची भेट घेतली.

close