जयस्वाल यांच्या घराची सीबीआयकडून झाडाझडती

September 8, 2012 3:21 PM0 commentsViews: 2

08 सप्टेंबर

कोळसा खाण वाटप गैरव्यवहार प्रकरणी आता तपासाला वेग आला आहे. विदर्भातले उद्योगपती मनोज जयस्वाल यांच्या नागपूरमधल्या घरातून सीबीआयने महत्वाची माहिती गोळा केल्याचं सूत्रांकडून कळतंय. सीबीआय अधिकार्‍यांनी आज दिवसभर जयस्वाल यांच्या घरात विचारपूस आणि तपास केला. त्यामुळे जयस्वाल यांच्या अटकेची चर्चा रंगली होती. पण जयस्वाल काल रात्रीच दिल्लीला गेल्याचं कळतंय. जयस्वाल यांना देण्यात आलेल्या कोळसा खाणींपैकी तीन खाणींमधून अजून उत्पादनच सुरू झालेलं नाही. जयस्वाल यांच्याबरोबरच काँग्रेस खासदार विजय दर्डा आणि राज्यातले शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांचीही सीबीआय चौकशी होण्याची शक्यता आहे. पुढच्या आठवड्यात दर्डा बंधूची चौकशी होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. जयस्वाल आणि दर्डा बंधू यांच्या विरोधात याआधीच सीबीआयने एफआयआर दाखल केला आहे. कोळशाच्या खाणी मिळवण्यासाठी त्यांनी चुकीची माहिती दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

close