यूएस ओपन स्पर्धेत सेरेनानं पटकावलं जेतेपद

September 10, 2012 1:07 PM0 commentsViews: 5

10 सप्टेंबर

अमेरिकन ओपन स्पर्धेत महिला गटात सेरेना विल्यमनं जेतेपद पटकावलंय. 30 वर्षांच्या सेरेनाचं हे विक्रमी 15वं ग्रँड स्लॅम ठरलं आहे. यंदाच्या हंगामात विम्बल्डन, त्यानंतर ऑलिम्पिक गोल्ड मेडल आणि आता युएस ओपन जिंकण्याची कमाल तीनं करुन दाखवली आहे.

यंदाच्या हंगामातला टेनिसप्रेमींसाठी हे परिचीत दृष्य, सेरेना विल्यम्सनं विजेतेपदाची ट्रॉफी उंचावली. 30 वर्षांच्या सेरेनाचं हे विक्रमी 15वं ग्रँडस्लॅम ठरलं. अपेक्षेप्रमाणेच फायनल चुरशीची झाली. फायनलमध्ये सेरेनाला आव्हान होतं वर्ल्ड नंबर वन व्हिक्टोरिया अझारेन्काचं. पण घरच्या मैदानावर खेळणार्‍या सेरेनाला जेतेपदासाठी सर्वाधिक पसंती होती.

सेरेनानंही मॅचची सुरुवात अगदी दणक्यात केली. पहिल्याच गेमध्ये सेरेनानं अझारेंकाची सर्व्हिस ब्रेक केली आणि हा सेट 6-2 असा खिशातही घातला. पण ऑस्ट्रेलिया ओपन चॅम्पियन अझारेंकानं हार मानली नाही. दुसर्‍या सेटमध्ये तीनं आपला खेळ उंचावला. सेरेनानं केलेल्या चुकांचा फायदा उचलत अझारेन्कानं दुसर्‍या सेटमध्ये दमदार कमबॅक केलं.

हा सेट 2-6 असा जिंकत अझारेंकानं मॅचमध्ये बरोबरी साधली. निर्णायक सेट जबरदस्त चुरशीचा झाला. एकही चुक परवडणारी नाही याची कल्पना या दोघींनाही होती. आणि त्यांनी सुरुवातही तशीच केली. 2-2 अशा बरोबरीनंतर मॅचमध्ये रंगत वाढली.

पण सेरेनानं पुन्हा एकदा तीच चूक केली. अझारेंकानं सेरेनाची सर्व्हिस ब्रेक करत 4-3 अशी आघाडी घेतली. मॅच जिंकण्यासाठी अझारेंकाने एक पाऊल पुढे टाकलं. पण जेतेपदाच्या निश्चयाने उतरलेल्या सेरेनानं आपल्या ताकदवान फोरहँडच्या जोरावर सलग दोन गेम जिंकत 5-5 अशी बरोबरी साधली.

यानंतर सेरेनाला रोखणं अझारेंकाला शक्य नव्हतं. सेरेनाच्या धडाक्यासमोर अझारेन्काचा निभाव लागला नाही. बिनतोड सर्व्हिस करत सेरेनानं हा सेट 7-5 असा जिंकला आणि विक्रमी जेतेपदावर आपलं नाव कोरलं. या विजयानंतर सेरेनानं एकच जल्लोष केला. अझारेंकाचं चौथ्यांदा अमेरिकन ओपन जिंकण्याचं स्वप्न मात्र अपूर्ण राहिलं. युएस ओपनचं जेतेपद पटकावत सेरेना विल्यम्सनं करिअरमधील तब्बल 15 वं ग्रँड स्लॅम टायटल पटकावलंय. आपण एक नजर टाकूया सेरेनाच्या ग्रँड स्लॅम जेतेपदांवर…

ऑस्ट्रेलियन ओपन – 2003, 2005, 2007, 2009, 2010फ्रेंच ओपन – 2002विम्बल्डन – 2002, 2003, 2009, 2010, 2012यू. एस. ओपन – 1999, 2002, 2008. 2012

close