अमरावती पुरामुळे 1200 हेक्टर पिकांचे नुकसान

September 8, 2012 11:55 AM0 commentsViews: 5

08 सप्टेंबर

विदर्भात झालेल्या मुसळधार पावसाचा अमरावती जिल्ह्याला जोरदार फटका बसला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये पावसाचा जोर कमी झाला असला तरी अनेक गावांमध्ये शिरलेलं पुराचं पाणी अजुनही कायम आहे. जोरदार पावसाने अमरावती जिल्ह्यातील सर्व धरणं ओव्हरफ्लो झाली आहे आणि त्यातून पाणी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे सर्व नद्यांना पूर आला आहे. पुराचा 133 गावांना फटका बसला आहे. दीड हजार घरांची पडझड झाली आहे. तर 1200 हेक्टरवरच्या पीकाचं नुकसान झालं आहे. घुईखेद या गावात बेमडा धरणाचे पाणी आल्याने गावातल्या सर्व घरांमध्ये 3 ते 4 फूट पाणी शिरलंय. गावातली शाळाही गेल्या चार दिवसांपासून बंद आहे. बेमबडा गावातही पाणी शिरल्याने लोकांना गेल्या काही दिवसांपासून पाण्यात राहावं लागतंय.

close