पी. चिदंबरम नवे गृहमंत्री

November 30, 2008 10:49 AM0 commentsViews: 3

30 नोव्हेंबर दिल्लीशिवराज पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर पी. चिदंबरम यांची केंद्रीय गृहमंत्रीपदी निवड होण्याची शक्यता आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिवराज पाटील यांनी पंतप्रधानांकडे राजीनामा दिला होता. शिवराज पाटील यांचा राजीनामा मंजूर केल्यानंतर तो राष्ट्रपतीकडे पाठवण्यात आला. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर आता केंद्रीय गृहमंत्री म्हणून पी. चिदंबरम यांची नेमणूक होण्याची शक्यता आहे. पी. चिदंबरम यांच्याकडे असलेली केंद्रीय अर्थमंत्रीपदाची जबाबदारी पंतप्रधान मनमोहन सिंग सांभाळतील.

close