पोलीस उपनिरीक्षकांवर हल्ल्याप्रकरणी 6 संशयित ताब्यात

September 10, 2012 1:30 PM0 commentsViews: 9

10 सप्टेंबर

तळोजा जेलचे उपनिरीक्षक भास्कर कचरे यांच्यावर काल प्राण घातक हल्ला झाला. या हल्ला प्रकरणात सहा संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय. हा हल्ला जेलमध्ये शिक्षा भोगत असलेला गुंड विक्की देशमुख याच्या गुंडानी केल्याचा संशय आहे. यामुळे क्राईम ब्रँचचे अधिकारी विक्कीला चौकशी साठी ताब्यात घेण्याच्या तयारीत आहेत. भास्कर कचरे हे प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्यावर काल संध्याकाळी झालेल्या हल्ल्यात ते बालंबाल बचावले. भास्कर कचरे यांचा काही दिवसांपूर्वी विक्की गँगच्या गुंडांसोबत वादावादी झाली होती. त्याचा सूड म्हणून हा हल्ला झाला असावा. पनवेल, कामोठे या परिसरात विक्की गँगच्या मोठ्या प्रमाणात कारवाया सुरू आहेत. या गँगचा प्रमुख विक्की देशमुख आहे. तो सध्या तळोजा जेल मध्येच आहे. यामुळे त्याची चौकशी झाली तर याबद्दल महत्त्वाची माहिती मिळू शकेल, असं क्राईम ब्रँचच्या अधिकार्‍यांना वाटतंय.

close