जलसत्याग्रहींचा विजय, पाणी पातळी कमी होणार !

September 10, 2012 1:43 PM0 commentsViews: 3

10 सप्टेंबर

मध्यप्रदेशमधल्या ओंकारेश्वर धरणाची जलपातळी वाढवण्याविरोधात आंदोलन करणार्‍या गावकर्‍यांचा अखेर विजय झाला आहे. जलपातळी कमी करण्याची मागणी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मान्य केली आहे. तसेच मोबदला आणि जमीनबाबतच्या इतर मागण्यांवर विचार करण्यासाठी 5 सदस्यांची समिती बनवण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. गेल्या 17 दिवसांपासून हे आंदोलक पाण्यात उभं राहून आंदोलन करत होते.

close