लक्ष्मण ढोबळेंच्या कॉलेजने दिले मान्यता नसताना प्रवेश

September 8, 2012 12:17 PM0 commentsViews: 3

08 सप्टेंबर

राज्याचे पाणी पुरवठा मंत्री लक्ष्मण ढोबळे पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. ढोबळेंच्या कर्मवीर औंदुबर पाटील विधी महाविद्यालयाला सोलापूर विद्यापीठाची मान्यता नाही. तरीही या विद्यालयाने 60 विद्यार्थ्यांना एल.एल.बीसाठी प्रवेश दिला असल्याची बाबसमोर आली आहे. त्यामुळे या विद्यालयात शिकणार्‍या विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलंय. या विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत बोलायला कुणीही तयार नाही. तर प्राचार्य विद्यापीठाकडे बोट दाखवत आहे.

close