सिंदियांच्या पत्रकार परिषदेत IACच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ

September 11, 2012 1:15 PM0 commentsViews: 7

11 सप्टेंबर

पाटण्यामध्ये केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या पत्रकार परिषदेत इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.यावेळी झालेल्या बाचाबाचीत काँग्रेस कार्यकर्ते आणि इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. ज्योतिरादित्य सिंदियांनी काही कार्यकर्त्यांशी बोलून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. ज्योतिरादित्य सिंदिया कोळसा खाण वाटपाबद्दल पत्रकारांशी बोलत होते. तेव्हा या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली.

close