मास्टरब्लास्टर सचिन फेसबुकवर

September 10, 2012 3:45 PM0 commentsViews: 5

10 सप्टेंबर

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या फॅन्ससाठी खूशखबर…सचिनने आता फेसबुकवर अकाऊंट ओपन केलं आहे आणि काही तासांतच त्याच्या पेजला साडेचार लाख चाहत्यांनी लाईक केलं आहे. सचिनचं याअगोदरच ट्विटर अकाऊंट आहे. आणि त्यावर त्याचे मोठे फॅन फॉलव्हर आहेत. आपल्या चाहत्यां प्रयत्न पोहचता यावे या हेतून सचिनने फेसबूकवर एंट्री केली आहे. विशेष म्हणजे सचिनने फेसबुकच्या मैदानात व्हिडिओ अपलोड करुनच उतरला आहे. मी माझ्या चाहत्यांचं फेसबुक परिवारात स्वागत करतो. मी एका लहान मुलाप्रमाणे भारतासाठी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पाहिले आणि गेली 22 वर्ष मी विश्वचषक जिंकण्याच्या स्वप्नाचा पाठलाग केला. हे सगळे आपल्या प्रेमामुळे होऊ शकले. माझ्यासाठी आणि टीमसाठी आपण प्रार्थना केली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. आता तुम्हा सर्वांशी मला संपर्क साधता यावा यासाठी मी फेसबुकच्या माध्यमातून आपणासर्वांना भेटणार आहे. माझ्या पेजला लाईक करा यामाध्यामातून आपण ऐकमेकांच्या गोष्टी शेअर करु शकतो.

सचिन फेसबुक पेज – https://www.facebook.com/SachinTendulkar

close