असीमला कोर्टाकडून जामीन मंजूर

September 11, 2012 1:30 PM0 commentsViews: 6

11 सप्टेंबर

व्यंगचित्रकार असीम त्रिवेदीला मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. 5 हजार रुपयांच्या वैयक्तिक बाँडवर हायकोर्टाने जामीन मंजूर केला. पण असीमने सशर्त जामीन घ्यायला नकार दिला आहे. पोलिसांनी त्रिवेदीला कोठडीत ठेवण्यासाठी पुरेसं कारण द्यावं असं कोर्टानं सांगितलं. त्यावर असीमच्या कोठडीसाठी पोलीस कोर्टाला समाधानकारक कारण देऊ शकले नाहीत. दरम्यान, असीम त्रिवेदीवरचा देशद्रोहाचा आरोपही मागे घेतला जाण्याची शक्यता आहे. कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर सरकार आपला निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. असीम त्रिवेदीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केल्यानंतर अनेक स्तरातून पोलिसांच्या या निर्णयावर टीका होतेय.

close