पिंपरीत पालिकेनं बिल्डरांसाठी घातला तलाव बुजवण्याचा घाट

September 10, 2012 4:47 PM0 commentsViews: 5

10 सप्टेंबर

पिपंरी-चिंचवड महापालिकेनं बिल्डरांसाठी संपूर्ण तलावच बुजवण्याचा घाट घातला आहे. तलाव बुजवण्याचा हा प्रस्ताव महापालिकेनं मंजूर केला आहे. मोती मुदलियार या जागरूक नागरिकाने या निर्णयाविरोधात कोर्टात धाव घेतली. त्यामुळे कोर्टाचा निर्णय होईपर्यंत महापालिकेनं निर्णय घेऊ नये, असं विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलंय. पण या तलावात पाणीच नसल्याचं सांगत महापौर मोहिनी लांडे यांनी या ठरावाचं समर्थन केलंय. महापालिका आयुक्त श्रीकर परदेशी यांनी या प्रकरणात मौन बाळगलंय. विशेष म्हणजे हा तलाव बुजवण्याचा प्रस्ताव दोन महिन्यापूर्वी रद्द करण्यात आला होता. त्यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आदेश दिले होते. पण आता हा प्रस्ताव मंजूर झाल्याने अजित पवार यांचीच या प्रकाराला मूक संमती असल्याचं मानलं जातंय.

close