सोलापुरात गाळ काढण्याचा नावावर अवैध वाळू उपसा सुरु

September 11, 2012 1:44 PM0 commentsViews: 58

11 सप्टेंबर

सोलापर जिल्ह्यातीला उजनी धरणातून गाळ काढण्याच्या नावावर बेकयदेशीरपणे वाळू उपसा सुरु आहे. रोज शेकडो ट्रक वाळू काढण्याचे काम राजेरोसपणे सुरू आहे. उजनीतल्या वाळू उपशासाठी ठाण्यातल्या महालक्ष्मी सहकारी संस्थेला परवाना देण्यात आला. हा परवाना थेट मंत्रालयातून देण्यात आला. विशेष म्हणजे हे धरण पाटबंधारे खात्यांतर्गत असताना महसूल आणि वन विभागाने ही परवानगी दिलीय. तर राज्यातल्या अनेक धरणांपैकी फक्त उजनीतला गाळ काढण्याचा निर्णय सरकारने का घेतला हा खरा प्रश्न आहे. तसेच धरणातला गाळ काढण्यासाठी सरकारने ठेकेदाराला पैसे द्यायला हवे होते. पण उलट ठेकेदारच सरकारला का पैसे देतोय, असा प्रश्न गावकरी विचारत आहेत.

close