गोव्यात सर्व 90 खाणींवर बंदी

September 10, 2012 5:24 PM0 commentsViews: 2

10 सप्टेंबर

गोव्यातल्या सर्व खाणी बंद ठेवण्याचे आदेश गोवा सरकारने दिले आहे. या खाणींच्या कामांचा फेरआढावा घेण्याचा निर्णय मनोहर पर्रीकर सरकारने घेतला. त्यामुळे हा फेरआढावा पूर्ण होईपर्यंत गोव्यातल्या 90 खाणी बंद राहणार आहेत. शाह आयोगाच्या अहवालानंतर सरकारने हा निर्णय घेतलाय. यापूर्वीच्या काँग्रेस सरकारने बेकायदेशीर खाणींना रोखलं नसल्याचा ठपका शाह आयोगाने ठेवला होता. बेकायदेशीर खाणींचा हा घोटाळा 35 हजार कोटींचा असल्याचं आयोगानं म्हटलं होतं. आणि अभयारण्यातल्या खाणी बंद कराव्यात अशी शिफारस केली होती.

close