तर नेत्यांवर,पोलिसांवर गुन्हे दाखल करावे लागेल – काटूज

September 10, 2012 5:35 PM0 commentsViews: 9

10 सप्टेंबर

न्यायमूर्ती आणि प्रेस काऊंसिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी मात्र असीमवर लावण्यात आलेल्या गुन्ह्यांचा तीव्र शब्दात निषेध केला. राजकीय नेतृत्त्वावरही परखड शब्दात टीका केली. भविष्यात असा प्रकार घडला तर राजकीय नेतृत्त्व आणि पोलीस यांच्यावर गुन्हेगारीस्वरुपाचे खटले दाखल करू असंही म्हटलंय.

मार्कंडेय काटूज म्हणतात,

'असं जर पुन्हा घडलं तर राजकीय नेतृत्व आणि पोलीस यांच्याविरोधात मला गुन्हेगारी खटले दाखल करण्याचा विचार करावा लागेल. खरं म्हणजे तेच गुन्हेगार आहेत. त्यांनाच अटक करायला हवी. कारण गुन्हा केला नसताना अटक करणं आणि डांबून ठेवणं हा आयपीसी अंतर्गत गंभीर गुन्हा आहे. राजकीय नेतृत्वाच्या आदेशानुसार काम करणार्‍या या पोलीस अधिकार्‍यांनाही कडक शिक्षा व्हायला हवी. कारण असे बेकायदेशीर आदेश धुडकावून लावणं हे त्यांचं कर्तव्य आहे. हा मूर्खपणा मी थांबवणार आहे. काही राजकारणी असहिष्णू झालेत. मी हे सहन करणार नाही. त्यांना आता वर्तणूक सुधारायला लावणार आहे. लोकशाहीच्या मार्गानंच त्यांनी वागायला हवं. त्यांची आताची वागणूक अजिबात खपवून घेतली जाणार नाही.' – न्या. काटजू

close