कुडनकुलम प्रकल्पाविरोधात आंदोलनला हिंसक वळण

September 10, 2012 5:49 PM0 commentsViews: 3

10 सप्टेंबर

तामिळनाडूमधल्या कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाविरोधातलं आंदोलन आता हिंसक बनत चाललं आहे. या प्रकल्पातल्या पहिल्या रिऍक्टरमध्ये लवकरच इंधन भरलं जाणार आहे. यापार्श्वभूमीवर प्रकल्पविरोधकांनी आज एक भव्य मोर्चा काढला. प्रकल्पाकडे कूच करणार्‍या या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधूर सोडला आणि हवेत गोळीबारही केला. या गोळीबारात एका आंदोलक मच्छिमाराचा मृत्यू झाला. त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनलीय आंदोलकांनी टुटीकोरीन-नगरकॉईल महामार्ग बंद पाडला. रेल्वे वाहतूकही ठप्प पाडली. मद्रास हायकोर्टानेही या प्रकल्पाला हिरवा कंदील दिला. त्यामुळे आता आंदोलन अधिक तीव्र होतंय. त्यामुळे परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. दरम्यान, हा प्रकल्प पूर्णपणे सुरक्षित आणि आणि मच्छिमारांनी प्रकल्पविरोधकांच्या आवाहनाला बळी पडू नये, असं आवाहन मुख्यमंत्री जयललीता यांनी केलंय. आंदोलनात मृत्यू झालेल्या मच्छिमाराच्या कुटुंबीयांना राज्य सरकारनं 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली.

close