मुंबईत गणेशोत्सवात बिनधास्त वाजवा रात्रभर ढोल

September 11, 2012 4:37 PM0 commentsViews: 6

11 सप्टेंबर

पुण्यापाठोपाठ आता मुंबईत गणेशोत्सवाच्या काळात रात्री दहानंतरही पारंपरिक वाद्यांचा आवाज घुमणार आहे. या काळात तीन दिवसांसाठी सरकारने गणेश मंडळांना ही परवानगी दिली आहे. पण त्यासाठी डेसिबलची मर्यादा पाळावी लागणार आहे. त्याचबरोबर तीन दिवस रात्री बारा वाजेपर्यंत लाऊडस्पीकरलाही परवानगी देण्यात आलीय. हे तीन दिवस कोणते हे लवकरच ठरवलं जाणार आहे. गणेश मंडळांसोबत आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे गणेश मंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे.

close