चुरशीच्या लढतीत भारताचा 1 रननं पराभव

September 11, 2012 5:29 PM0 commentsViews: 3

11 सप्टेंबर

चेन्नई टी-20 मॅचमध्ये चुरशीच्या लढतीत न्यूझीलंडने भारताचा 1 रननं पराभव केला. शेवटच्या बॉलवर भारताला विजयासाठी 4 रन्सची गरज होती पण रोहित शर्माला केवळ 2 रन्स घेता आले.भारताने टॉस जिंकून पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने 168 रन्सचं आव्हान भारतासमोर ठेवलं होतं. ब्रँडन मॅक्युलमने सर्वाधिक 91 रन्स केले. याला उत्तर देताना भारताची सुरुवात खराब झाली. ओपनिंगला आलेला गौतम गंभीर 3 रन्सवर आऊट झाला. विराट कोहली आणि सुरेश रैनानं इनिंग सावरण्याचा प्रयत्न केला. पण रैना 27 आणि कोहली 70 रन्सवर आऊट झाले. तर कमबॅक करणार्‍या युवराज सिंगनं 34 रन्सची खेळी केली. कॅप्टन धोणी 22 रन्सवर नॉटआऊट राहिला. भारताला न्यूझीलंडविरुध्द अजूनही एकही टी-20 मॅच जिंकता आलेली नाही..

close