असीम त्रिवेदींवरचा देशद्रोहाचा खटला मागे घेणार ?

September 11, 2012 10:00 AM0 commentsViews: 3

11 सप्टेंबर

व्यंगचित्रकार असीम त्रिवेदींवरील देशद्रोहाचा आरोप मागे घेतला जाण्याची शक्यता आहे. राज्य सरकार येत्या 24 तासात तसा निर्णय घेणार आहे. कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर सरकार आपला निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. असीम त्रिवेदींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केल्यानंतर अनेक स्तरातून पोलिसांच्या या निर्णयावर टीका केली. रविवारी असीम त्रिवेदीला अटक करण्यात आली होती. काल सोमवारी त्याला कोर्टासमोर हजर करण्यात आले असता आपण जामीन घेणार नाही असा पवित्रा घेतला. कोर्टाने त्याला 24 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

close