मनमाडमध्ये 22 दिवसआड पाणी

September 12, 2012 4:27 PM0 commentsViews: 2

12 सप्टेंबर

भर पावसाळ्यातही तब्बल 22 दिवसांनी पाणी. ऐकून विश्वास बसत नाही, पण ही परिस्थिती आहे मनमाडची. एका बाजुला पावसाने फिरवलेली पाठ आणि दुसर्‍या बाजुला शासनाच्या खात्यांमधल्या समन्वयाचा अभाव, यात मनमाड सारखी लहान शहरं भरडली जात आहेत. मनमाड नगरपालिकेवर जीवन प्राधिकरण आणि वीज वितरणच्या कर्जाची थकबाकी तब्बल 25 कोटींच्या पुढे गेली. त्यामुळे पंपिंग स्टेशनवरच्या 4 पैकी 3 पंप गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहेत. स्वत: नगराध्यक्षही याबद्दल हतबल झाले आहे.

close