असीम जामीन स्वीकारण्यास तयार, बुधवारी सुटका

September 11, 2012 3:43 PM0 commentsViews: 3

11 सप्टेंबर

व्यंगचित्रकार असीम त्रिवेदीनं अखेर जामीन स्वीकारण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे आता असीमच्या सुटकेचा मार्ग मोकळा झालाय. उद्या दुपारी एक वाजेपर्यंत तो जामिनावर बाहेर येऊ शकेल. आज कोर्टाने 5 हजार रुपयांच्या वैयक्तिक बाँडवर हायकोर्टाने जामीन मंजूर केला. पण असीमनं सशर्त जामीन घ्यायला नकार दिला होता. वादग्रस्त व्यंगचित्र काढल्यामुळे असीमला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवलं होतं. जोपर्यंत देशद्रोहाचा आरोप मागे घेतला जात नाही, तोपर्यंत जामिनासाठी अपील करणार नसल्याचं असीम म्हटलं होतं.

close