अबू जुंदलला 14 दिवसांची एटीएस कोठडी

September 11, 2012 10:12 AM0 commentsViews: 5

11 सप्टेंबर

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ला प्रकरणातला आरोपी आणि लष्कर ए तोयबाचा अतिरेकी अबू जुंदलसह बिलाल शेख आणि हिमायत बेगला एटीएसची कोठडी मिळाली. मुंबई एटीएसने या तिघांना आज नाशिकमधल्या कोर्टात हजर केलं. जुंदलला 24 सप्टेंबरपर्यंत तर बिलाल आणि बेगला 15 सप्टेंबरपर्यंत कोठडी मिळाली आहे. नाशिकमधल्या पोलीस ट्रेनिंग ऍकडमी, देवळाली कॅम्प यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी केल्याप्रकरणी एटीएसने 2010 मध्ये बिलालला अटक केली होती. 26 /11 आणि जर्मन बेकरी प्रकरणातला संशयित आरोपी हिमायत बेग आणि अबू जुंदलसोबत बिलाल काम करीत असल्याचा एटीएसचा संशय आहे. त्यांच्याकडे मिळालेल्या पुराव्यांनुसार या तिघांविरोधात नाशिकच्या सातपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे.

close