कलमाडींना IOAची निवडणूक लढवण्यास कोर्टाचा मज्जाव

September 13, 2012 9:30 AM0 commentsViews: 4

13 सप्टेंबर

कॉमनवेल्थ घोटाळ्यातील मुख्य आरोपी सुरेश कलमाडींना दिल्ली हायकोर्टाने दणका दिलाय. सुरेश कलमाडी भारतीय ऑलिम्पिक महासंघाची निवडणूक लढवू शकणार नसल्याचा निर्णय दिल्ली हायकोर्टाने दिला आहे. क्रीडा नियमांनुसार भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या निवडणुका पार पाडाव्यात असा निर्वाळा दिल्ली हायकोर्टाने दिला आहे. यानुसार कोणाही अधिकार्‍याला तीन वेळेपेक्षा जास्त अध्यक्ष होता येत नाही आणि सुरेश कलमाडी तीन वेळा अध्यक्ष झाले आहेत. गेली 18 वर्ष कलमाडी आयओए (IOA) चे अध्यक्ष आहेत. त्यामुळे या नियमांनुसार कलमाडींना आता भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाग घेता येणार नाही. हा निर्णय म्हणजे सुरेश कलमाडींना दणका मानला जातोय.

close