भारत-पाक क्रिकेट मॅच होऊ देणार नाही – राज

September 12, 2012 9:51 AM0 commentsViews: 3

12 सप्टेंबर

पाकिस्तानी कलाकारांना भारतात येण्यास विरोध करणार्‍या मनसेनं आता पाकिस्तानी क्रिकेटर्सनाही विरोध केला आहे. महाराष्ट्रात भारत आणि पाकिस्तानमध्ये एकही मॅच होऊ देणार नाही असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिला. शिवसेनेनंही यापूर्वी भारत-पाक सामन्यांनाविरोध केला होता. यावर्षी 25 डिसेंबरपासून पाकिस्तानची क्रिकेट टीम भारत दौर्‍यावर येतेय. 6 जानेवारीपर्यंत पाक क्रिकेट टीमचा दौरा असेल. या दौर्‍यात 3 वनडे आाणि 2 टी-20 मॅच होणार आहेत. काही दिवसांपूर्वी सुप्रसिध्द गायिका आशा भोसले यांनी मनसे आता भारत-पाक सामन्यावर काय भूमिका घेते याकडे माझे लक्ष आहे असा टोला लगावला होता. आशाताईंच्या भूमिकेलाही राज यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

close