डॉ. सरस्वती मुंडेला हायकोर्टाचा दणका, गर्भपात प्रकरणी दोषीच

September 13, 2012 9:41 AM0 commentsViews: 36

13 सप्टेंबर

परळी गर्भपात प्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या डॉ. सरस्वती मुंडेला औरंगाबाद खंडपीठाने आणखी एक धक्का दिला आहे. साामाजिक कार्यकर्त्या ऍड. वर्षा देशपांडे यांनी डॉक्टर सरस्वती मुंडे यांचं 2010 मध्ये स्टिंग ऑपरेशन केलं होतं. त्यात डॉ. मुंडे सोनोग्राफी करुन लिंगनिदान करत असल्याचं उघड झालं होतं. पण त्यानंतर अंबाजोगाई कोर्टाने सरस्वती मुंडेची निर्दोष सुटका केली होती. पण आता हायकोर्टाने अंबाजोगाई कोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. ऍड.वर्षा देशपांडे यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर कोर्टाने हा निर्णय दिला.

close